Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरशहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली..रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा सेवा...

शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली..रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा सेवा उपक्रम–

जळगाव – दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशन तर्फे अमर शहीद हुतात्म्यांना रक्तदानाने नुकतीच आदरांजली वाहण्यात आली,या प्रेरणादाई उपक्रमात दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता स्वयंस्फूर्त रक्तदान करून देशासाठी समर्पित,हुतात्म्यांना वंदन करून विनम्र आदरांजली अर्पण केली..


या रक्तदान शिबिरा प्रसंगी रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे (आय.ए.एस.) ,चेअरमन श्रीमती.मंगला ठोंबरे,रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार जैन,उपाध्यक्ष गनीभाई मेमन, डॉ.शशिकांत गाजरे,हेमत जकातदार,डॉ.उल्हास तासखेडकर,अनिल भोळे यांच्यासह सोबत मान्यवर व रक्तदाते आवर्जून उपस्थित होते.

सुरळीत रक्तपुरवठा असावा व पीडित, गंभीर तसेच थॅलेसिमिया,हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षय आजाराने त्रस्त असलेल्यांना वेळीच जीवनदान लाभावे या करिता रक्तदान सेवेचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.आपला देश पारतंत्र्यातून मुक्त व्हावा या करिता अगणीक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती, बलिदान दिले असून यानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त अमर शहीद हुतात्म्यांना रक्तदान करीत विनम्र अनोखी आदरांजली या प्रसंगी अर्पण करण्यात आली.

यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी.गणेशकर, सीए.हितेश आगीवाल,गणेश पाटील,अक्षय महाजन,सतिश महाजन,हर्षद भारती,अजय देशमुख,गोपाल वालेच्या,अविनाश पाटील,रणजीत गव्हाळे,डॉ.मेहुल कुमार,वैभव निकुंभ,आदींनी सहकार्य दिले.

शहरासह जिल्ह्यातील सामाजिक सेवाभावी संस्था,प्रतिष्ठाने,पदाधिकारी,कार्यकर्ते यांनीही देशासाठी समर्पित हुतात्म्यांची आठवण म्हणून रक्तदान सेवेत सतत बाराही महिने सहभाग द्यावा व रक्तदानाच्या पावन कार्यात सहभाग घेऊन पीडित गंभीर रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या