संभाजी नगर – दि.१४ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ,जळगाव जिल्ह्याच्या वतीने मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याचा अभिमान मनात घेऊन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले.
यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला हातात तिरंगा ध्वज घेऊनमहासंघाच्या सदस्यांनी राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा संदेश दिला यावेळी वाहतूक क्षेत्रातील विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाहतूक संघटना संयुक्त महासंघ,जळगाव यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तिरंगा रॅलीला विशेष उत्साह प्राप्त झाला
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भव्य तिरंगा रॅलीत सहभागी होताना देशसेवा राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प महासंघाच्या वतीने करण्यात आला उपस्थित पदाधिकारी इरफान शेख प्रदेश उपाध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नरेंद्र ताराचंद पाटील (शहर अध्यक्ष) शेख नबी शेख करीम कुरेशी (शहर उपाध्यक्ष) तौसिफ मोहम्मद अल्ताफ मोहम्मद (शहर सहसचिव) मुश्ताक शाह पिरन शाह (शहर संपर्क प्रमुख) वसीम अली कलीम अली (उपसंपर्क प्रमुख) मुश्ताक शेख मुख्तार जळगाव शहर (कार्यकारिणी सदस्य) वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जळगाव यांच्या वतीने तिरंगा रॅलीत सहभागी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
