जळगाव – दि. १३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) : जळगाव त्रिपदी परिवाराची साप्ताहिक त्रिपदी कृष्णपुरम सोसायटी, गुजराल पेट्रोल पंपामागील परिसरात राहणारे गुरुबंधू श्री. किशोर वामनराव सोनवणे यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी श्री. किशोर सोनवणे, सौ. निर्मला सोनवणे व प्रसाद सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करून त्रिपदीची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी त्रिपदी परिवारातील श्री. विलास नेवे, प्रदीप सोनवणे, विश्वनाथ पुजारी, चंद्रकांत तळेले, राहुल विसपुते, बाल्या खैरनार, सौ. प्रतिभा तळेले आणि कविता सोनवणे यांची उपस्थिती लाभली.

