जळगाव :- दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्वरवेध फाउंडेशनतर्फे चैतन्यनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघात ‘भारत हमको जान से प्यारा है’ या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात इंजि. भागवत पाटील, सौ. अंजली धुमाळ, श्री. निळकंठ कासार यांच्यासह विविध कलाकार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन ज्योती राणे पाटील करणार आहेत.
हा कार्यक्रम दि.१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत चैतन्यनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघात होणार आहे. शहरातील सर्व रसिक श्रोत्यांसाठी कार्यक्रम विनामूल्य असून,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्वरवेध फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी केले आहे.
