Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरमाइंड स्प्रिंग-२६’मधून नवकल्पनांना मिळणार उद्योजकतेचे व्यासपीठ...जळगावात प्रदर्शन-सह-विक्री उपक्रमाचे आयोजन..

माइंड स्प्रिंग-२६’मधून नवकल्पनांना मिळणार उद्योजकतेचे व्यासपीठ…जळगावात प्रदर्शन-सह-विक्री उपक्रमाचे आयोजन..

जळगाव :- दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटरतर्फे ‘माइंड स्प्रिंग-२६’या प्रदर्शन-सह-विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पना,सर्जनशीलता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचे उद्यमात रूपांतर करा!’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थी उद्योजक,नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि युवा क्रिएटर्सना आपल्या कल्पना, प्रोजेक्ट्स,उत्पादने व सेवा सादर करण्यासह त्यांची थेट विक्री व प्रमोशन करण्याची संधी मिळणार आहे.या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजक व गुंतवणूकदारांशी नेटवर्किंग, तसेच उत्कृष्ट कल्पना व प्रकल्पांसाठी रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि इनक्युबेशन सपोर्ट मिळणार आहे.माइंड स्प्रिंग-२६चा मुख्य कार्यक्रम ६ व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी KCES मूलजी जेठा महाविद्यालयाच्या बास्केटबॉल कोर्टवर होणार आहे. प्रारंभिक नोंदणी १ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करता येणार आहे.नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांसाठी ₹२००,जास्तीत जास्त तीन विद्यार्थ्यांच्या गटासाठी ₹४००, माजी विद्यार्थ्यांसाठी ₹५००, तर बाहेरील सहभागींसाठी ₹३,००० निश्चित करण्यात आले आहे. स्टॉलची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.या संदर्भात संपर्क : डॉ. प्रेमजीत जाधव – ८३९०६३६७०७, डॉ. विजेता सिंग – ८२३७४००६०९, डॉ. पूनम जामधाडे – ९०२८१७३३८७, मोहित जाधव – ९२८४२९५२६२, तुषार चौधरी – ९३२६८३६९००, पल्लवी राणे – ८०५५३७०३५०.
या क्रमांकावर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या