Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरसुप्रसिद्ध धान्य व्यापारी तथा गोसेवक नारायण वाणी यांचा ८३ वा वाढदिवस उत्साहात...

सुप्रसिद्ध धान्य व्यापारी तथा गोसेवक नारायण वाणी यांचा ८३ वा वाढदिवस उत्साहात साजरा.

जळगाव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव येथील नवी पेठेतील रहिवासी, सुप्रसिद्ध धान्य व्यापारी सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ गोसेवक नारायण वामन वाणी यांचा ८३ वा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वयाची ८३ वर्षे पूर्ण करून त्यांनी ८४ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट,मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी वाणी परिवारातर्फे खानदेश कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात भावनिक आणि आनंददायी वातावरण अनुभवायला मिळाले. त्यांच्या आप्तेष्ट, मॉर्निंग ग्रुपचे मित्र,नवी पेठ परिसरातील रहिवासी तसेच नवी पेठ गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या सहवासातील अनेक जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे वाणी परिवारातर्फे आभार मानण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे सुपुत्र मनीष वाणी, अतुल वाणी आणि विजय वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या