जळगाव :- दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात शनिवार,दि.१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०६ वी पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे,ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, सौ.रमा तारे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.पद्मजा जोशी, आनंद चौधरी आणि जगदीश साळुंखे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता,लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सचिन देशपांडे होते.प्रास्ताविक सौ.रोहिणी प्रचंड यांनी केले.यावेळी विद्यार्थी विवेक रमण रायगुडे,यशराज महेंद्र शिंपी,शेजल किशोर नारखेडे,परेश गढे,निकेतन सतीश लोहार,गौरव गिरीश देशमुख,जय किरण महाजन, हार्दिक किरण ठाकरे,खुशाल गजानन पाटील, हिमांशु निलेश चौधरी,वीणा सचिन जोशी,श्रद्धा शरद कंखरे ,निशा राम शिंदे,काव्य संदीप राठोड,दूर्वा अविनाश बाविस्कर,कृष्णा हेमंत नेरकर,कुणाल गणेश साबळे आणि कामिनी शिंपी यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर मराठी व इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे सादर केली.सोमनाथ महाजन यांनी कृतीयुक्त गीत सादर केले,तर श्रीमती संपदा छापेकर यांनी लोकमान्य टिळकांवरील प्रेरणादायी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे,सौ.मंगला भारुडे तसेच योगेश सोनजे यांनी मनोगत व्यक्त करत अण्णा भाऊ साठे यांच्या समता,न्याय व बंधुतेच्या विचारांचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि देशसेवेच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मनीषा पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
