जळगाव :- दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाबळ परिसरातील श्री समर्थ रामदास स्वामी मंदिरात श्रीसमर्थ मासिक संगीत सभेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली’गुरुपौर्णिमा सूरसंध्या’भक्तिरसाने ओतप्रोत वातावरणात संपन्न झाली.
“गुरु एक जगी त्राता” या पूरिया कल्याण रागातील गाजलेल्या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर “सर्वात्मका सर्वेश्वरा” या शिवस्तुतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या स्वरयज्ञात गायक दिलीप चौधरी, संपदा छापेकर, रेणुका जोशी, मंदा वाणी आणि दुष्यंत जोशी यांनी विविध भक्तिगीते सादर करून पूज्य सद्गुरूंना स्वरांजली अर्पण केली.
कार्यक्रमात नमिला गणपती,गुरु कृपा तारी, गुरा तो जिने, दादाजी गुरु नाम है, गुरु तोची देव, आनंद केला गुरुराया, दर्शन द्या गुरुनाथा, गुरुजी म्हारे, दादाजी दया कर दो, वैद्य भेटला सुखदाता आदी भक्तिगीतांचे भावपूर्ण सादरीकरण करण्यात आले.त
बल्यावर चि. यज्ञेश जेऊरकर यांनी समर्थ साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निरूपण ज्येष्ठ गायक मकरंद देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित रसिक आणि मंदिर व्यवस्थापनाचे आभार मानले.या भक्तिमय सूरसंध्येला रसिक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
