Friday, September 11, 2026
Homeचोपडा परिसरहिंदूंनी ‘स्वबोध’ व ‘शत्रुबोध’ जागृत ठेवून देश-धर्म रक्षणासाठी संघटित व्हावे : सौ....

हिंदूंनी ‘स्वबोध’ व ‘शत्रुबोध’ जागृत ठेवून देश-धर्म रक्षणासाठी संघटित व्हावे : सौ. सुवर्णाताई साळुंखे

चोपडा – दि.१  (प्रतिनिधी): देश आणि धर्मावर होणारे आघात आता केवळ सीमांपुरते मर्यादित राहिलेले नसून ते समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे हिंदू समाजाने स्वतःचा ‘स्वबोध’ (सामर्थ्य व धर्मज्ञान) आणि ‘शत्रुबोध’ (शत्रूच्या कारस्थानांची जाणीव) जागृत ठेवून देश-धर्म रक्षणासाठी संघटित होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जळगाव येथील सनातन संस्थेच्या सौ.सुवर्णाताई साळुंखे यांनी केले.त्या चोपडा येथील कृष्ण मंदिराजवळील यज्ञ वैकल्य मंडळ हॉल येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि साधनेची दिशा’ या विषयावरील प्रवचनात बोलत होत्या.यावेळी राष्ट्र व धर्मकार्यासाठी योगदान देणारे भाजपा नगरसेवक शरद पाटील तसेच शिवसेना (शिंदे गट) चे ईश्वर अलकारी यांचा सनातन संस्थेच्या वतीने भगतसिंग पाटील व अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै रोजी देशभरातील ६४ ठिकाणी तसेच जळगाव, पाळधी, खर्ची आणि चोपडा येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी आपत्कालीन परिस्थिती व जागतिक संकटांचा विचार करून नागरिकांनी प्रथमोपचार, अग्निशमन आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.महोत्सवात श्री व्यासपूजन,गुरुपूजन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांच्या संदेशाचे वाचन ,रामराज्य स्थापनेचा संकल्प ,नामजप, धर्मरक्षकांचा सत्कार,स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, तसेच राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ व फलक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी हिंदुत्ववादी श्याम परदेशी, गोविंद मराठे, ज्योती वारके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन राजेंद्र बारी यांनी केले, तर सूत्रसंचालन सुधाकर चौधरी यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या