जळगाव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची सलग आठव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. केमिस्ट भवन येथे झालेल्या सभेत उपस्थित सभासदांनी एकमताने त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. याचवेळी उपाध्यक्षपदी संदीप बेदमुथा, सचिवपदी अनिल झंवर तर कोषाध्यक्षपदी दिनेश मालू यांचीही बिनविरोध निवड झाली.
नव्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली.या निवड प्रक्रियेसाठी भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा (पारोळा) आणि अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले.
सुनिल भंगाळे यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून संघटनेत विविध पदांवर कार्य करत जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे नेतृत्व प्रभावीपणे सांभाळले आहे. केमिस्ट बांधवांच्या हितासाठी सातत्याने कार्य करत त्यांनी संघटनात्मक बळकटी, सेवाभावी उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे. केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली संघटनेचे कार्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
संघटनेचे अनुभवी सचिव अनिल झंवर यांची खंबीर साथ तसेच इतर पदाधिकारी आणि सभासदांच्या सहकार्यामुळे सुनिल भंगाळे यांनी अनेक संघटनात्मक व समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले.केमिस्ट बांधवांच्या विविध समस्या सोडविण्या साठी ते नेहमी तत्पर राहिले असून,त्यांच्या धाडसी निर्णयक्षमता,व्यापक जनसंपर्क आणि सेवाभावी कार्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात त्यांचा विशेष सन्मान आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनीही करण्यात आला आहे.
सुनिल भंगाळे यांच्या आठव्यांदा झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड..समवेत उपाध्यक्षपदी संदीप बेदमुथा तर सचिवपदी अनिल झंवर,कोषाध्यक्ष पदी दिनेश मालुंची निवड घोषित..
RELATED ARTICLES
