Tuesday, July 7, 2026
Homeजळगांव शहरजळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे वृक्षारोपणासाठी मनपाला सहकार्याचे आवाहन..

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे वृक्षारोपणासाठी मनपाला सहकार्याचे आवाहन..

जळगांव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स असो.ने प्रत्येक केमिस्टच्या दुकाना समोर घरा समोर दोन झाडे लावुन त्याचे संगोपन करायचे अशी संकल्पना जाहीर केली आहे.सौ.दिपमाला काळे,महापौर जळगांव शहर,मनपा आयुक्त आदित्य जीवने यांना विनंती पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.

शहरात सिमेंटचे रस्ते आहेत.त्या ठिकाणी सहज खोदून खोल करणे शक्य होणार नाहीत.म्हणुन मनपा कडून खड्डे खोदून दिले तर संघटनेच्या माध्यमाने तेथे वृक्षा रोपण करुन “माझे शहर माझी जबाबदारी प्रमाणे संपूर्ण जळगांव शहरातील केमिस्टच्या माध्यमातून दुकाना समोर/घरा समोर दोर झाडे लावली जाणार आहेत.त्या साठी विनंती पत्राद्वारे महानगरपातीके कडून खड्डे करून मिळावे अशी विनंती या  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याप्रसंगी अध्यक्ष सुनील भंगाळे,सचिव अनिल झंवर, ब्र्जेश जैन,तालुका अध्यक्ष समीर गुळवे, विलास बर्डे,नरेश मंधान पंकज पाटील,साकीर चित्तलवाला ,यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या