जळगांव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) १५४ वर्षाची अखंड परंपरा जपणाऱ्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताई राम पालखी जळगाव ते पंढरपूर पायी वारीला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आप्पा महाराज मंदिरात जिल्हा केमिस्ट संघटने तर्फे वारकऱ्यांना प्रवास करत असताना आरोग्य सुरक्षित राहण्या दृष्टीने आज दि.२९ रोजी मोफत औषध सामुग्री बॉक्स पालखी प्रमुख श्री मंगेश महाराज जोशी यांचेकडे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी भेट दिला.या प्रसंगी सचिव अनिल झंवर ,तालुका अध्यक्ष समीर गुळवे,विलास बर्डे,प्रवीण कोठावदे,व इतर पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती.
जळगांव जिल्हा केमिस्ट संघटना हा सामाजिक सेवा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात सातत्याने राबवत आहे.प्रत्येक दिंडीला या उपक्रमातून मोफत औषध पुरवठा केला जातो.त्या मुळे अनेक भाविक भक्तांना या उपक्रमाचा लाभ होत आहे.वारकऱ्यांचा उत्साह वाढवण्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे.अशी माहिती त्यांनी या प्रसंगी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.
या प्रसंगी आप्पा महाराज समाधी मंदिर येथून पालखी प्रस्थान होत असताना ह.भ.प .श्री मंगेश महाराज यांचे समवेत ज्ञानोबा तुकाराम जयघोषात टाळ मृदुंगाच्या साथीने जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे ,सचिव अनिल झंवर यांनी देखील सहभाग घेतला.श्री मंगेश महाराज यांनी संस्थानाच्या मनोगतात जळगाव जिल्हा केमिस्ट संघटना अतिशय प्रभावी कार्य करून वारकऱ्यांना प्रौत्सहीत करत असल्याचे सांगत इतर संघटना समोर आदर्श निर्माण केला आहे या शब्दात प्रशंसा केली.
जळगाव जिल्हा केमिस्ट संघटने तर्फे पंढरीच्या पायी वारीत सहभागी वारकऱ्यांना मोफत औषध सामुग्री भेट..सुनिल भंगाळे यांच्या संकल्पनेतून सेवाभावी उपक्रम..
RELATED ARTICLES
