Sunday, September 13, 2026
Homeजळगांव शहर“आणिबाणी काळातील योद्ध्यांचा जळगाव भाजपा तर्फे आज होणार सन्मान”

“आणिबाणी काळातील योद्ध्यांचा जळगाव भाजपा तर्फे आज होणार सन्मान”

जळगांव – दि.२६ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) “आणिबाणी काळातील योद्ध्यांचा जळगाव भाजपा तर्फे आज दि.२६ रोजी एका विशेष कार्यक्रम आयोजनातून सन्मान”केला जात आहे.

कोंग्रेस च्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी जून १९७५ मध्ये देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या कालखंडाला आज ५१ वर्षे झाली असून त्या अत्यंत भयानक वातावरणात संविधान आणि लोकशाही च्या रक्षणासाठी आंदोलन करत तूरूंगवास व हालअपेष्टा सहन करण्या-या मिसा बंदी आणि सत्याग्रहींना जळगाव महानगर भाजपा तर्फे आज शूक्रवार दि.२६ जून रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच तूरूंगवास भोगलेल्या पण आज हयात नसलेल्यांच्या कूटूंबियांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

जळगाव महानगर जिल्ह्या भाजप च्या वतीने शूक्रवारी सकाळी १० वा.जळगाव येथील भाजप कार्यालय (जी.एम.फाऊंडेशन) येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या वेळी “आणिबाणी ची दाहकता” या विषयावर सामाजिक समरसता मंचाचे ज्येष्ठ विचारवंत प्रा.रमेश जी महाजन(धरणगाव) यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन संयोजक आशिष सपकाळे आणि महानगर जिल्हाअध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या