Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरविष्णुसहस्र नामाची गोपाळकाला व ५६ भोग ने सांगता..सुरभी व श्री सिद्धिविनायक गणपती...

विष्णुसहस्र नामाची गोपाळकाला व ५६ भोग ने सांगता..सुरभी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर महिला मंडळाचा उपक्रम..


जळगांव – दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सुरभी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर महिला मंडळातर्फे अधिक महिन्यानिमित्त दि १७ मे पासून सुरु असलेल्या विष्णुसहस्र नामाची सांगता १५ जुन रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर,रेल्वे कॉलनी येथे करण्यात आली.दि.१४ रोजी गोपाळकाला करण्यात आला. सर्व महिलांनी वेगवेगळे पदार्थ आणून एकत्र गोपाळकाला करण्यात आला.दि.१५ ला सोमवारी शेवटच्या दिवशी श्री विष्णूंना ५६ भोग लावण्यात आले. सुरवातीला ओम नमो भगवते वासुदेवाय चे १०८ वेळा नामस्मरण. नंतर विष्णुसहस्र नाम पठण,व उपस्थित सर्व महिलांचा हस्ते आरती करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन सुरभी अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी,लताताई झवर,नीलिमा नाईक व सौ स्वाती झवर ह्यांनी केले.५६ भोग सजावट सुनीता सातपुते ,मंगला अमृतकर,सौ विद्या चौधरी,सौ राजश्री बोरोले, राखी झवर ह्यांनी केली.सौ अश्विनी जोशी,कुंदाताई जोशी ह्यांनी गोपाळ कृष्णाचे भजन म्हटले.ज्योती भोकरडोळे, सुनीता साळुंखे,ज्योती तलवारे,उर्मिला खडके,शैलजा नेमाडे,मंदाकिनी पाटील, उर्मिला खडके,चारुलता जोशी,शुभदा राव,लता सोनवणे,रंजना पांडे,सुवर्णा मते,पूनम जोशी ह्यांनी सहकार्य केले.ह्यावेळी उषा पाटील,वृषाली सूर्यवंशी,रंजना शूर, ललिता टिपरे, रागिणी तारकस,रेवती शेंदुर्णीकर, कमलताइ बोरोले,वत्सला चौधरी,सुरडकर तसेच सुरभीच्या व रेल्वेकॉलनी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.भजन व गरब्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.दररोज ४० ते ४५ महिलांनी सहभाग घेतला.सर्वांचे आभार सौ स्वाती कुळकर्णी ह्यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या