Friday, June 12, 2026
Homeजळगांव शहरफेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रिजनच्या कार्यकारणीवर विनीत जोशी...

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रिजनच्या कार्यकारणीवर विनीत जोशी ..

जळगाव+दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रीजनच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये २०२६ ते २८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी घोषणा करण्यात आली.त्यात जळगावच्या विनीत जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्षपदी किरण व्ही.शांताराम यांची उपाध्यक्ष म्हणून वीरेंद्र चित्राव (पुणे),सचिव संदीप मांजरेकर(मुंबई),कोषाध्यक्ष दिलीप बापट(कोल्हापूर) तर विभागीय सचिव म्हणून जितेंद्र पाटील(लातूर), कार्यालयीन सचिव प्रणव साळगावकर(ठाणे) यांच्यासह १२ कार्यकारणी सदस्य व ७ स्वीकृत सदस्यांची देखील निवड करण्यात आली आहे.

यात जळगावच्या अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी यांचा कार्यकारणी सदस्य म्हणून समावेश आहे.खान्देशातून त्यांची एकमेव निवड झाली आहे.गेल्या १३ वर्षात त्यांनी या क्षेत्रात सक्रिय योगदान दिले असून देवगिरी फिल्म फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे ते माजी अध्यक्ष असून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे त्यांनी खानदेश विभागाचे पहिले रिजन हेड म्हणून कार्य केले आहे.

फिल्म सोसायटी चळवळ जास्तीत जास्त तरुणाभिमुख करून कॉलेज व शालेय स्तरावर फिल्म क्लब स्थापन करणे व चित्रपट विषयक अधिकाधिक उपक्रम करण्याचे अजिंठा फिल्म सोसायटी व फेडरेशनचा उद्देश असल्याचे विनीत जोशी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या