जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरापासून जवळ मुख्य जळगाव धुळे हायवे वर पोखरी फाट्याला गुरुसुमंत सखाराम दरबार अंतर्गत श्री राम दरबार,१२ मारुती,सप्तचिरंजीव आणि गायत्री देवीची कमळामध्ये स्थापना या सर्वांचा प्राण प्रतिष्ठापना विधी सोहळा दि.१४,१५,१६,१७ जून २०२६ रोजी निश्चित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने द्यावी कार्य सोहळा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्वरूपात पार पडणार आहे,त्यानुसार आपण सर्वांनी परिवारासह सहभागी होवून हा कार्यसोहळा संपन्न करण्यास परिपूर्ण करण्यास यथामती यथाशक्ती तन-मन धन स्वरूपात सहकार्य करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे..
श्री स्वामी समर्थ महाराजांचे सन २०१७ रोजी श्री सद्गुरू स्वामी सखा यांनी स्थापित केलेले श्री गुरुपद्म उपासना स्थान तसेच सर्व भक्तांनी मिळून गोपद्म गोशाळेतील गोमातेचे सेवा कार्य व परिसरात लावलेले १००० वृक्ष वेली या सर्व अध्यात्मिक उपासना परिसरात श्री स्वामी महाराज सेवाश्रम मंडळ,पोखरी तांडा यांच्यामार्फत सुरू असलेले नियोजित श्री राम दरबार व अकरा मारुती प्राणप्रतिष्ठापना तसेच सप्तचिरंजीवांचे प्रतीकात्मक स्वरूपाची स्थापना यांचे मंदिर निर्माण कार्य करण्यासाठी निधी संकलन केले जात आहे.यासाठी पोखरी तांडा येथील सर्व भक्त मंडळी तर्फे आवाहन करण्यात आले आहे.यामध्ये आपल्या परिसरातील सर्व वरिष्ठ मंडळींनी भगवतकार्यामध्ये सहभाग घेऊन या भागवत कार्यातील खर्चाचा अंदाज घेऊन प्रत्येक कुटुंबाचा सहभाग रहावा यासाठी भिक्षा देणगी जमा करावी व इतरांनाही त्याबद्दल सुचित करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
निर्माण कार्याची वैशिष्ट्य
मंदिर निर्माण प्रतिकृती ही पशुपतीनाथ मंदिर पागोडा शैली मधील राहील,मंदिर निर्माण कार्यामध्ये सर्व भक्तांकडून अकरा कोटी राम जप लिहून मंदिरात ठेवण्यात येईल,मंदिरात श्री राम दरबार म्हणजे भगवान राम लक्ष्मण व जानकी माता यांची स्थापना होईल,मारुतीच्या अकरा विविध नावांनी व स्वरूपामध्ये काळा पाषाणातील मूर्तींची स्थापना होईल,संपूर्ण भारतातील एकमेव असे सप्तचीरंजीवांच प्रतिकात्मक स्वरूपात मानवी शरीरातील सप्तचक्रांच्या आधारावर स्थापना होईल,कमळाच्या फुलाच्या आकारातील २०,००० लिटर क्षमता असलेला सहस्र जलकुंभ निर्माण करून त्यावर कमळाच्या फुलांमध्ये मध्यभागी पंचमुखी गायत्री देवीची स्थापना होईल.गर्भगृह १५×१५ फुटाचा असून १८×४० फुटाचा भव्य सभा मंडप राहील,शास्त्रशुद्ध पद्धतीने नवकुंडी यज्ञ शाळेचे निर्माण केले जात आहे,
मुख्य जळगाव धुळे हायवे वर पोखरी फाट्याला श्री स्वामी महाराजांचे श्री गुरुपद्म अध्यात्मिक तीर्थक्षेत्र (उपासना स्थान) म्हणून ३०×४५ फूट भव्य गेट उभारणी ,परिसरात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कडुलिंब वड पिंपळ औदुंबर अशा विविध १००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल,श्री गुरुपद्म येथे उपासनेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी शेण माती कुडाची झोपडी (कुटी) राहण्यासाठी तयार करण्यात येईल.
अशा वैशिष्ट्यपूर्ण भगवत कार्यामध्ये आपण आपला सहभाग सहकार्य निश्चितपणे करावे असे आवाहन श्री स्वामी महाराज सेवाश्रम मंडळ ,पोखरी तांडा जळगाव यांनी केले आहे.अधिक माहिती व सहभागासाठी संपर्क-९२७२३३२०८० या क्रमांकावर साधावा.
