जळगांव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) आज भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणातील जननेते, माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा कार्यालय, जी. एम. फाउंडेशन, जळगाव येथे अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) तथा भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्व. मुंडे साहेबांनी सर्वसामान्य, वंचित व शोषित समाजघटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य, त्यांचे नेतृत्व आणि संघटन कौशल्य यांचे स्मरण उपस्थित मान्यवरांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.श्री. राध्येश्याम चौधरी, भाजपा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जयेश भावसार, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव यांनी स्व.गोपीनाथ राव मुंढे यांच्या जीवनावर आधारित राजकीय व सामाजीक योगदान या बद्दल मार्गदर्शन केले. राजेंद्र मराठे, दिपक परदेशी, मिलिंद चौधरी, राहुल मराठे,प्रकाश पंडित, मयूर भदाणे, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, विनोद मराठे, महेश चौधरी, जितेंद्र चव्हाण, भाजपा गटनेते प्रकाश बालाणी,नगरसेवक अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे-पाटील, रमेश मताणी, मनोज बाविस्कर, गणेश माळी, मुविकोराज कोल्हे, दिलीप लाडवंजारी, तुषाळ सूर्यवंशी, राजेंद्र खैरनार इ. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
