जळगांव – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव विधान परिषद निवडणूक २०२६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जेष्ठ नेतृत्व कुशल संघटक नंदू महाजन यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे.ही उमेदवारी निश्चित झाल्याने समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.रोज कानावर येणाऱ्या नव्या नावांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दि.३१ मे रोजी राज्यातील एकूण १० उमेदवार अधिकृत यादी भजप केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केली.त्यात जळगाव विधान परिषद निवडणूकिसाठी रावेर येथील (जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी)नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी निश्चित करून पक्षाने परिश्रमपूर्वक कार्य करणाऱ्या नेतृत्वाला या निवडणुकी साठी संधी दिली आहे.
समिती तर्फे जाहीर अधिकृत यादीत विभाग वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली-अरुण लखाणी, भंडारा,गोंदिया-अविनाश ब्राह्मणकार,अमरावती -प्रवीण पोटे पाटील,सांगली-सातारा-धैर्यशील कदम,सोलापुर- राजेंद्र राऊत,अहिल्यानगर-प्राजक्त तनपुरे,छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट,नाांदेड़- अमर राजूरकर,धाराशिव लातूर बीड-बसवराज पाटील ,नागपूर डॉ.राजीव पोतदार या प्रमाणे उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आले आहे.
