Wednesday, May 27, 2026
Homeजळगांव शहरश्रीराम मंदिरात सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे श्री विष्णू सहस्र नाम...

श्रीराम मंदिरात सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे श्री विष्णू सहस्र नाम पठण.


जळगांव – दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) अधिक मासा निमित्त श्रीराम मंदिरात सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळा तर्फे श्री विष्णू सहस्रनाम  पठण करण्यात आले.

सुरवातीला ओम नमो भगवते वासुदेवाय चा जप करून पठनाला सुरवात करण्यात आली. सौ रश्मिताई मंगेश महाराज जोशी अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी व सर्व उपस्थित महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. सौ स्वाती कुळकर्णी ह्यांनी सौ रश्मिताई जोशी ह्यांचा ओटी भरून सन्मान केला. उपस्थित महिलांनी ,भगवान श्री राम, सिता व लक्ष्मणाला अधिक मासानिमित्त वाण लावण्यात आले.

ह्यावेळी सुरभीच्या मानसी जोशी, ज्योती भोकरडोळे, पूनम जोशी, सुनीता सातपुते, आशा जोशी, सविता नाईक, स्मिता बंगाली व सदस्य तसेच श्री सिद्धिविनायक मंडळाच्या सदस्य व परिसरातील 50/60 महिला उपस्थित होत्या.

सौ रश्मिताई जोशी ह्यांनी सुरभीच्या अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.व उपस्थित सर्व महिलांची ओटी भरली.गणपतीची ,देवीची,श्री रामाची व गोपाळ कृष्णाच्या आरतीने तसेच सौ ऋचा मोहरीर ह्यांनी दिलेल्या प्रसादाने सांगता करण्यात आली ह्यावेळी ह भ प श्री मंगेश महाराज जोशी उपस्थित होते.

१७ जुन पर्यंत पठणाचा कार्यक्रम सकाळी ८ वा श्री सिद्धिविनायक मंदिरात सुरु रहाणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी असून उपस्थितीचे आवाहन अध्यक्षा सौ स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या