जळगांव – दि.१९(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) केमिस्टचा देशव्यापी बंद बाबत त्या मागची भूमिका व शासनाकडे विविध मागण्या व होत असलेल्या अन्याया संदर्भात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.त्यात २० मे बंद बाबत निवेदन देताना तसेच बंद का पाळण्यात येणार? याबाबत चर्चा केली.
या प्रसंगी जळगाव जिल्हा केमिस्ट अध्यक्ष सुनील भंगाळे,सचिव अनिल झंवर,ब्रिजेश जैन,नरेश मंधान, जळगाव तालुका सेक्रेटरी विलास बरडे आदींची उपस्थिती होती.
