जळगाव दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
इनरव्हील क्लब जळगाव स्पार्कल,बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन जळगाव आणि लक्ष्मीनारायण सोलर सिस्टम्स जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लहान बस स्टॅन्ड समोर पाणपोईचे उद्घाटन महापौर सौ.दीपमाला चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
जळगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या इनरव्हील क्लब जळगाव स्पार्कलच्या चार्टर प्रेसिडेंट माधवी असावा,वाईस प्रेसिडेंट सुधा काबरा,तसेच माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व असोसिएशन ट्रेझरर सौ. लाठी, क्लब कॉरस्पॉन्डंट सीमा जाखेटे,सौ.संगीता तोतला,संगीता अग्रवाल, तसेच लक्ष्मीनारायण सोलर सिस्टम्सचे स्वप्निल जाखेटे व सचिन जाखेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या पाणपोईचे आयोजन करण्यात आले आहे. ही पाणपोई नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून समाजसेवेच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित नागरिकांना थंडगार मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
