Friday, September 11, 2026
Homeताज्या बातम्याआज माँ बागलामुखी जयंती ..श्रद्धा, शक्ती आणि स्तंभन तत्त्वाची दिव्य अनुभूती ......

आज माँ बागलामुखी जयंती ..श्रद्धा, शक्ती आणि स्तंभन तत्त्वाची दिव्य अनुभूती … विशेष लेखन – अतुल अग्रवाल (स्वामी कृपांकित ) वास्तु व अंक शास्त्र विशारद.

माँ बागलामुखी जयंती निमित्त मा बागलामुखी भक्तांना भक्तीसाठी प्रेरित करणारा माहितीपूर्ण लेख..

नलखेडा-दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) वैशाख शुक्ल अष्टमी हा दिवस सनातन परंपरेत अत्यंत पवित्र आणि सिद्धीदायक मानला जातो. दहा महाविद्यांपैकी एक, अद्वितीय आणि प्रभावशाली अशी माँ बागलामुखी यांची जयंती याच दिवशी साजरी केली जाते. यंदा २४ एप्रिल रोजी येणारा हा पावन दिवस साधक, उपासक आणि सर्वसामान्य भक्तांसाठी आत्मशक्ती जागृत करण्याचा, संकटांवर विजय मिळवण्याचा आणि जीवनात स्थैर्य प्राप्त करण्याचा सुवर्णयोग ठरतो.

माँ बागलामुखीला “पीतांबरा देवी” म्हणून ओळखले जाते.पिवळा रंग हा तिचा आवडता असून तो तेज, श्रद्धा,आत्मविश्वास आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. देवीचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण आहे—एका हाताने ती शत्रूची जिभ पकडून त्याचे दमन करते, तर दुसऱ्या हातात गदा धारण करून अन्यायावर प्रहार करते. हे रूप केवळ बाह्य शत्रूंवर विजयाचे प्रतीक नसून, आपल्या अंतर्मनातील भय, राग, मत्सर, संशय आणि नकारात्मक विचारांना नियंत्रणात ठेवण्याचा गूढ संदेश देते.

   मानवी जीवनातील “नऊ शत्रू” आणि देवीचे         अधिष्ठान

मानवाच्या जन्मापासूनच त्याच्या जीवनात काही अदृश्य शत्रू कार्यरत असतात—आजारपण, दारिद्र्य, मत्सर (जेलसी), न्यायालयीन अडचणी, वैवाहिक तणाव, मानसिक दबाव, अधिकाराचा गैरवापर, सामाजिक संघर्ष आणि अनिश्चितता.
या सर्व संकटांना थांबवण्याची, निष्प्रभ करण्याची आणि त्यावर विजय मिळवून देण्याची दिव्य शक्ती माँ बागलामुखीच्या “स्तंभन तत्त्वात” सामावलेली आहे.

                 पौराणिक आधार
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या काळात पांडवांना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी माँ बागलामुखीची उपासना करण्याचा उपदेश केला होता, या साधनेच्या प्रभावाने शत्रूंची वाणी, बुद्धीपौराण

 तांत्रिक देवी – गैरसमज आणि वास्तवमाँ बागलामुखीला “तांत्रिक देवी” म्हणून संबोधले जाते, परंतु तंत्र ही केवळ गूढ गोष्ट नसून एक शास्त्रशुद्ध आध्यात्मिक पद्धती आहे. श्रद्धा, सात्विकता आणि नियमबद्ध साधना यांद्वारे सर्वसामान्य भक्तालाही तिचे सकारात्मक आणि त्वरित फळ अनुभवता येते.

              अनुभवातून पटलेले सत्य

आजच्या काळातही अनेक भक्तांना या देवीच्या कृपेचे प्रत्यक्ष अनुभव येत आहेत. माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगायचे झाल्यास, मी माझ्या असंख्य ग्राहक परिवाराला या देवीच्या दर्शन व सेवेसाठी सिद्धपीठ येथे जाण्याचा सल्ला देतो. विशेष म्हणजे, तेथून परत आल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल ते स्वतः सांगतात—मनःशांती, अडचणींमध्ये घट, निर्णयक्षमता वाढ आणि आत्मविश्वासात वृद्धी. इतकेच नव्हे, तर या अनुभवामुळे ते भक्त नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी पुन्हा पुन्हा जात आहेत—हीच मातेच्या कृपेची खरी प्रचिती म्हणावी लागेल.
                        जयंतीचे महत्त्व
या दिवशी “ॐ ह्लीं बगलामुख्यै नमः” या मंत्राचा जप अत्यंत फलदायी मानला जातो. पिवळ्या फुलांनी, हळदीने आणि चण्याच्या नैवेद्याने पूजा केली जाते. उपवास, जप, हवन आणि दान यांमुळे मन शुद्ध होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

माँ बागलामुखी जयंती ही केवळ धार्मिक परंपरा नसून, आत्मजागृती आणि अंतर्मनातील शक्ती अनुभवण्याचा एक दिव्य पर्व आहे. श्रद्धा, संयम आणि साधनेच्या बळावर जीवनातील प्रत्येक संकट “स्तंभित” करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा या दिवसातून मिळते. माँ बागलामुखी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!..मातेची कृपा आपल्या जीवनात स्थैर्य, सामर्थ्य, संरक्षण आणि विजयाची नवी दिशा देवो ही मायेच्या चरणी प्रार्थना.

                  – अतुल अग्रवाल (स्वामी कृपाकित )
                  वास्तु व अंक शास्त्र विशारद.
                            मो.9763125711.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या