Saturday, April 18, 2026
Homeजळगांव शहरमुक्ताईनगरात आज भगवान परशूराम पालखी उत्सव भव्य आयोजन..समाज बांधवांना मार्गदर्शनाचा लाभ..

मुक्ताईनगरात आज भगवान परशूराम पालखी उत्सव भव्य आयोजन..समाज बांधवांना मार्गदर्शनाचा लाभ..


जळगाव – दि.१८ (धर्म साथी मीडिया नेटवर्क) ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था सर्व शाखिय ब्राह्मण समाज जळगावतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री परशुराम पालखी उत्सव उत्साहात साजरा होत आहे.शनिवार दि.१८ व रविवार दि.१९ रोजी हा सोहळा होणार असून आज दि १८ रोजी मुक्ताई नगर परिसरात भगवान परशूरामाची पालखी उत्साहपूर्ण वातावरणात सायंकाळी काढण्यात येणार आहे तसेच दि.१९ रोजी सकाळी महाआरती कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या निमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजन करण्यात आले आहे.
भगवान परशुराम पालखी मिरवणूक (पालखी सोहळा) ही भारतीय संस्कृतीतील भावनिक परंपरा आहे.ही मिरवणूक भक्ती,परंपरा आणि समाजातील ऐक्याचे जिवंत प्रतीक आहे.पालखी मिरवणूक गावातील वातावरण भक्तीमय व पवित्र बनवते.ढोल-ताशांचा गजर,टाळ-मृदंगाचा नाद आणि भगवान परशुरामाचा जयजयकारात संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.हा पालखी सोहळा एक सामुदायिक उत्सव बनला आहे.ज्यात सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात.हा सोहळा भक्ती,आनंद,एकात्मता आणि संस्कृती चा संगम घडवणारा एक अद्वितीय अनुभव आहे.ब्राह्मण समाजाचे प्रेरणास्थान भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव व पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे शहरात संस्थेतर्फे साजरा केला जात आहे.शनिवार दि.१८/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (एस.एम.आय.टी कॉलेज जवळ) येथून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे.यावेळी टाळ-मृदुंग,ढोल व लेझीम पथकासह शोभयात्रा श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर,प्रेमनगर येथे मार्गक्रमण करीत पोहचेल.या प्रसंगी श्री.मंगेश महाराज जोशी,श्री दादा महाराज जोशी,श्री देवेंद्र गढीकर गुरुजी,श्री देवदत्त मोरदे यांचे आशिर्वाद लाभत असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री,अध्यक्ष भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅप्टन आशिष दामले आ.राजू मामा भोळे,महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी,स्थायी समिती सभापती मनपा डॉ.चंद्रशेखर पाटील,नगरसेविका सौ.मानसी भोईटे शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नितीन कुळकर्णी,जळगाव जनता बँक अध्यक्ष सतीश मदाने,व्ही.एम.भट यांची विशेष उपस्थिती लाभत आहे.याच ठिकाणी आमंत्रित मान्यवरांचे मार्गदर्शनाचा लाभ समाज बांधवांना होणार असून समाजाचे नाव उंचावून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधवांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संस्थेतर्फे केला जाणार आहे.महाप्रसाद वितरण होवून तेथे कार्यक्रमाची सांगता होईल.तसेच रविवार दि.१९/०४ /२०२६ रोजी श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर येथे सकाळी ७.०० वा.भगवान परशुरामाच्या मुर्तीला अभिषेक,आरती व पुजन केले जाईल या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपसंघटक तथा मुख्य समन्वयक ब्राह्मण संघर्ष समिती सौ.अर्चना सुरडकर यांच्या शुभहस्ते समाजबांधवांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न होईल व सायंकाळी श्री भगवान परशुराम शोभायात्रेच्या मिरवणुकीत पालखी सामील होईल.तरी मोठ्या संख्येने सकल ब्राह्माण समाज बांधवांनी व संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित राहावे.आपल्या सहभागा तून ब्राह्मण एकता वाढवावी,असे आवाहन पालखी प्रमुख प्रसाद पटवे गुरुजी व समस्त ब्रह्मश्री परिवायांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या