Friday, May 29, 2026
Homeजळगांव शहरबहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्याअध्यक्षपदी पूनम तिवारींची सर्वानुमते निवड..

बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्याअध्यक्षपदी पूनम तिवारींची सर्वानुमते निवड..

जळगांव – दि.७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची आज गौराई सभागृह येथे होळी मिलन,महिलादिन आणि पुढील दोन वर्षांसाठी नूतन अध्यक्ष व कार्यकारणी यांची निवड करण्यात आली.यावेळी विविध खेळ तसेच अंताक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आले या सभेमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव धुम धडाक्यात साजरा करणेचा ठराव होऊन तसेच येणाऱ्या दोन वर्षा करीता अध्यक्षा म्हणुन पूनम तिवारी यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड यांनी केली.सल्लागार स्वातीताई कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. मागील दोन वर्षांचा लेखाजोखा कोषाध्यक्ष वृषाली ताई जोशी यांनी मांडला.या कार्यक्रमाचे आयोजन माजी अध्यक्षा वृंदा भालेराव सचिव अंजली हांडे सह सचिव वर्षा पाठक कोषाध्यक्ष वृषाली जोशी यांनी केले सभेमध्ये कार्यकारिणीत पुढील प्रमाणे निवड करणेत आली.संस्थापक अध्यक्ष सुधा खटोड,सल्लागार- स्वाती कुलकर्णी,वृंदा भालेराव,अंजली हांडे,राजश्री रावल उपाध्यक्षा:अनुराधा कुलकर्णी.मालती वैष्णव,सचिव-नम्रता उपाध्याय,मानसी जोशी कोषाध्यक्ष:वृषाली जोशी,सविता नाईक,सक्रिय कार्यकारिणी सदस्य:वर्षा पाठक,वैशाली नाईक,मृदुला कुलकर्णी,मंजुषा पवनीकर उषा पाठक,आसावरी जोशी,भगवती दायमा,प्रियंका त्रिपाठी,छाया त्रिपाठी,अपर्णा कुलकर्णी,ज्योती कुलकर्णी ,रेखा व्यास,अश्विनी जोशी,पुनम जोशी,सुनिता सातपुते ,शारदा पंचारिया,वर्षा उपाध्याय,सुनिता नाबरिया,मंजुषा अडावदकरपरशुराम जन्मोत्सव समिती:वर्षा पुरोहिते,स्वप्नगंधा जोशी,कीर्ती दायमा,कमला दायमा,पूजा दायमा, कल्पना खटोड,विजया पांडे,गायत्री पंडित,रंजीता वैष्णव,नंदिता जोशी,मंगला दायमा,प्रीती भजनी, सविता परमार्थ,ज्योती कुळकर्णी,संगिता प्रविण शूर,संध्या नाईक,हेमांगी डहाळे,स्मिता शुक्ल,आशा जोशी

या प्रमाणे कार्यकारिणीची निवड झाली आहे. येत्या १९ एप्रील रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव सर्व समाज एकत्रीत येऊन साजरा करणार असल्याने जय्यत तयारीस लागण्याचे निश्चित करण्यात आले.सभेचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन अंजली हांडे यांनी केले. .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या