जळगांव – दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेची मुलुख मैदान तोफ ,इतिहास पुरुष केमिस्ट भूषण सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस आज दिनांक २२ रोजी ऊर्जा दिवस म्हणून केमिस्ट बांधव विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत.कार्यात धडाडी,स्वभावाने करारी, गतिशील निर्णय क्षमता बाळगून संघटनेचे खमके नेतृत्व करीत असताना केवळ केमिस्ट संघटनेचेच नव्हे तर विविध व्यापक सामाजिक सेवा कार्यातून मागील तीस वर्षापासून साधलेली सातत्यपूर्ण अखंडित, सेवाभावी वाटचाल केमिस्ट परिवार व समाजाला प्रेरणादायी ठरत आहे.
जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून केलेले निर्भीड संघटनात्मक व उल्लेखनीय व्यापक स्वरूपातील सामजिक कार्य केमिस्ट व समाज कधीही विसरू शकणार नाही. सामान्य केमिस्ट बांधवांच्या अडीअडचणीत अर्ध्या रात्री पाठीशी उभे राहणारे भाऊ म्हणून त्यांची खरी ओळख आहे. केमिस्ट हित जपण्यासाठी त्यांचे जिवापाड प्रयत्न तसेच केमिस्ट प्रतिनिधित्व,केमिस्ट सेवाभावी कार्य समाजातील सर्व क्षेत्रात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
देश व राज्य पातळीवरील प्रभावी औषध विक्रेत्यांचे श्रद्धास्थान केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या सामाजिक विकासाचा विचार त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने ते सदैव जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे. सामाजिक कार्याची मुळातच अभिरुची असलेले सुनील भाऊ परिश्रम घेत मागील अनेक वर्षांपासून अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवण्यात यशस्वी झाले आहेत. केमिस्ट हा केवळ व्यवसाय नसून समाजाचे ऋण फेडण्यासाठी सेवाभावी होवून प्रयत्नशील राहणे सेवाव्रत होणे हाच आपला खरा धर्म असल्याचे ते ठासून सांगतात.
केमिस्ट संघटनेचा नावलौकिक वाढवणारे महत्त्वपूर्ण सामाजिक सेवाभावी कार्य..
केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून मागील तीस वर्षांपासून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक भव्य व व्यापक स्वरूपातील सेवा पोचवण्यासाठी त्यांनी नियोजनापूर्वक कार्य केले आहे. शीतशेवपेटी उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गावापर्यंत ही सेवा महत्वपूर्ण ठरत आहे.तसेच जिल्हाभरातील सर्व तालुका खेडे यातून निघणाऱ्या वारकरी दिंड्यांना पायी वाऱ्यांना जाणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत औषध पुरवठा सुविधा त्यांनी संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात विविध गावांना आरोग्य तपासणी व मोफत औषध पुरवठा शिबिरांचे आयोजन, गरजू महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन औषध वितरण सेवा,अपंग बांधवांसाठी देखील यापूर्वीच्या काळात जयपुर फूट कॅम्प सारखे उपक्रम राबवून योगदान दिलेले आहे तसेच वृक्षारोपण मोफत जलपुरवठा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सत्कार सोहळ्यांचे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, ईद मिलन सोहळा आयोजन असे असंख्य उपक्रम राबवून समाजाची उदंड सेवा केली आहे वाढदिवसानिमित्त परमेश्वर त्यांना दीर्घायु निरोगी आरोग्य प्रदान करो हीच शुभकामना…!
लेखन-श्री दिनेश मालू
सदस्य जिल्हा कार्यकारणी,जळगांव जिल्हा केमिस्ट संघटना
