Monday, February 23, 2026
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव..

नशिराबाद नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव..

नशिराबाद – दि २४.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) काल दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता नशिराबाद  नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ) यांचा   अभिष्टचिंतन सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात व्हाइट हाउस या निवासस्थानी साजरा झाला .ग्रामस्थ ,हितचिंतक ,मित्र परिवाराने  मनःपूर्वक शुभेच्छां दिल्या.

यंदा प्रथमच नशिराबाद नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस साजरा होत असल्याने अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव झाला.राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांना भेट घेवून पुढील विकासात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार व त्यांचे सहकारी मित्र,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचेसह सर्व निवडून आलेले नगरसेवक,गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, व्यापारी,सामाजिक,धार्मिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश होता .नशिराबाद येथील श्री विष्णू मंदिराला २२५ वर्ष पूर्ण होत असल्याने तेथे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष योगेश पाटील सहभागी झाले होते.

या प्रसंगी पुढील वाटचालीत जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा न जावू देता सेवाभावी वृत्तीने नशिराबाद परिसरात घवघवीत विकास घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असून सर्व समस्यांचा अभ्यास करून त्यांचा निपटारा करण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या