जळगांव – दि.१३ (धर्मसाथी लाईव्ह न्यूज) प्रभाग क्रमांक १३ मधील विवीध विकास कामांना गती देण्यासाठी वडिलांचा राजकीय वारसा सोबत असलेले महायुती उमेदवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) प्रफुल्ल देवकर यांच्या दणदणीत प्रचाराने संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला आहे.प्रभागातील मतदारांचा भव्य प्रतिसाद त्यांना मिळाला आहे.यंदाच्या वेळी त्यांना सर्व मतदारांनी विजयी करण्याचा संकल्प केला आहे.
प्रफुल्ल देवकर यांचे नव्या विकासाचे व्हिजन मतदारांना आवडत असून त्यांच्या सारख्या कणखर उमेदवाराला विजयी केल्यास संपूर्ण प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून संपूर्ण विकास होवू शकेल अशी धारणा मतदारांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
या संदर्भात धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की मला संधी मिळणारच आहे.त्या संधीचे मी सोने करणार आहे.प्रभागतील जनता आमच्या परिवारावर विश्वास ठेवून आहेत.व आम्ही देखील त्या विश्वासाला तडा न जावू देता सर्वाँना सोबत घेवून विकासाचा रथ पुढे नेवून या प्रभागाला नवीन दिशा देणार आहोत.कायापालट घडवून आणणार आहोत.
प्रभाग १३ मधील महायुती उमेदवार प्रफुल्ल देवकरांना मतदारांचा भव्य प्रतिसाद..प्रभागाच्या विकासासाठी सर्वाँना सोबत घेवून कार्य करण्याची संकल्पना..
RELATED ARTICLES
