Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरमहापालिका रणसंग्राम प्रभाग क्र.४ 'अ ' मधून भाजपा तर्फे सौ.शशीबाई (शशिकला) शिवचरण...

महापालिका रणसंग्राम प्रभाग क्र.४ ‘अ ‘ मधून भाजपा तर्फे सौ.शशीबाई (शशिकला) शिवचरण ढंढोरे यांना उमेदवारी.. कमळ फुलवण्याचा निर्धार..

जळगांव – दि.३१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगांव महापालिका निवडणूक रण संग्रामात प्रभाग क्रमांक ४ ‘मधून सौ.शशीबाई (शशिकला) शिवचरण ढंढोरे यांना भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी मिळाल्याने त्यांनी भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार केला आहे.ढंढोरे परिवाराचा अखंडित सामाजिक व राजकीय वारसा व जन्सेवेचे व्रत जपत प्रभाग ४-‘अ’च्या भाजपा उमेदवार सौ.शशिकला शिवचरण ढंढोरे यांच्या माध्यमातून यापुढे हा वारसा चालवण्या साठी महापालिका निवडणूक लढवत आपण प्रभागातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करून सेवाभावी कार्यातून पती मा. नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या मार्गदर्शनाने व पुत्र संदीप ढंढोरे तसेच ढंढोरे परिवार यांच्या सहकार्यातून परिपूर्ण असा विकास साधणार असल्याची भावना त्यांनी धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केली. आपणास भाजपाने उमेदवारी दिल्याने आ.राजू मामा भोळे व भाजपा पदाधिकारी यांचे आभार देखील त्यांनी या प्रसंगी मानले./>

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या