Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedचाळीसगाव तालुका केमिस्ट संघटने तर्फे आयोजित बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद..

चाळीसगाव तालुका केमिस्ट संघटने तर्फे आयोजित बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद..

चाळीसगाव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
चाळीसगाव तालुका केमिस्ट संघटनेतर्फे आयोजित संघटन बैठकीस केमिस्ट संपर्क अभियानाअंतर्गत जिल्हा कार्यकारणी तर्फे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी दिषादायक मार्गदर्शन देवून नव्या सदस्यांना प्रोत्साहित केले.या प्रसंगी व्यासपीठावर त्यांचे समवेत जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष संदिप बेदमुथा,कोषाध्यक्ष शामकांत वाणी,पाचोरा तालुका केमिस्ट संघटनेचे राजेन्द्र भोसले यांचेसह चाळीसगाव तालुका अध्यक्ष  संजय पाटील, रोशन गुळेचा, व चाळीसगाव तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा व चाळीसगाव तालुका कार्यकारणी तर्फे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या विशेष उपस्थितीत संघटनेच्या वतीने  सकाळी ११ वाजता प्रारंभी चाळीसगाव नगरपरिषदेत विजयी झालेल्या नगराध्यक्ष सौ.प्रतिभा ताई चव्हाण तसेच समवेत इतर ३ केमिस्ट नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देवून त्यांच्या निवास स्थानी भेट देत सत्कार केला.या प्रसंगी मोठ्या संख्येने चाळीसगाव तालुका केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.त्यानंतर मालेगाव चाळीसगाव मार्गावरील गिरणा धरण परिसरात चाळीसगाव तालुका  संघटनेच्या वतीने आयोजित संघटन बैठकीत जिल्हा कार्यकारणी मान्यवरांचे आगमन झाले..बैठकीच्या प्रारंभी चाळीसगाव तालुका केमिस्ट संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यकारणीचे  जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ देवून व्यासपीठावर सत्कार केला.या प्रसंगी उपस्थित केमिस्ट बांधवांना यथोचीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी संघटनेचे महत्व पटवून सांगितले तसेच आपल्या समस्या कमी होण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी सदैव आपल्या पाठीशी आहे.आपणास अडचण आल्यास आमच्याशी त्वरित संपर्क साधा.मार्गदर्शन घेत रहा. संघटित राहून कार्य करीत रहा.नव्या चेहऱ्यांना संधी द्या, पुढील खडतर काळात स्थिर व्यवसाय करण्या करीता जोडधंदे सुरू करा.अश्या प्रकारे बैठकीचे नियोजन बध्द उत्तम आयोजन केल्याबद्दल सर्वांचे  कौतुक त्यांनी केले.या बैठकीत त्यांचे मार्गदर्शन अगोदर उपस्थित सायगाव,मंदाने,पिलखोड अश्या विविध गावातून आलेल्या नवीन सदस्यांचा त्यांनी परिचय करून घेतला.यांनतर या निसर्गरम्य स्थळी सर्व उपस्थित मान्यवर ,जिल्हा व तालुका पदाधिकारी,केमिस्ट सदस्यांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन जिल्हा सदस्य तथा माजी अध्यक्ष योगेश भोकरे यांनी तर आभार प्रदर्शन राकेश माळी,यांनी केले.विशेष सहकार्य झोन प्रमुख बिपिन पाटील, विपुल सोनवणे, संजय पाटील,श्री.आहेरे,दिनेश शिरोडे,महेश पाटील,मयूर महाजन आदी  बांधवांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या