जळगांव – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जेष्ठ सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते कोळी समाजातील सेवाभावी व्यकिमत्व स्व.रविभाऊ उर्फ रविनाना यांना दि.१० रोजी देवाज्ञा झाली.आज दि.१९ रोजी दशक्रिया विधी निमित्त रक्तदानातून त्यांच्यावर व ठाकरे परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते व आप्तजन, मित्र परिवार अश्या २३ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सुरुवातीला स्व.रवीनाना यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचा,जीवन कार्याचा परिचय करून देण्यात आला.शुक्रवार दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक,प्रभात चौक येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय राजपूत करणी सेना,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई/प्रज्ञावंत फोंडेशन,जळगांव यांच्या वतीने करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला रक्तपेढी जिल्हा रुग्णालय यांचे सौजन्य लाभले.
स्व. रविनाना ठाकरे यांच्या स्मरणार्थ रक्तदानातून श्रद्धांजली अर्पण..
RELATED ARTICLES
