जळगाव – दि १० ( धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील वाल्मिकनगर पक्की चाळ येथील रहिवासी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र रामदास ठाकरे यांचे दि.१०/१२/२५ रोजी दुपारी ३.२५ मि. अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. त्यांचे पश्चात जेष्ठ भगिनी माजी नगरसेविका सुमनताई ठाकरे, भाऊ शैलेश आप्पा ठाकरे, पत्नी ३ मुले, भाचे, पुतणे ,सूना, भाचे, पुतणे,सूना, नातवडं असा मोठा परिवार आहे. ते रितेश, कल्पेश निलेश ठाकरे यांचे वडील होत. अंत्ययात्रा दि. ११/१२/१५ रोजी सकाळी. १० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
जिल्हाभरात मोठा जनसंपर्क असलेले सेवाभावी प्रेमळ जिव्हाळा जपणारे व्यक्तिमत्त्व ठाकरे परिवाराचे प्रेरणास्थान रवींद्र ठाकरे यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरातील त्यांच्या मोठ्या मित्र परिवारात, कार्यकर्त्यांमध्ये, समाज बांधव,आप्त वाईकात शोककळा पसरली .एक प्रामाणिक सेवाभावी सहकार्य करणारा मित्र ,सदैव पाठीशी उभे राहणारा मार्गदर्शक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
