Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरबळीराम पेठेतील श्री दत्त मंदिरात दत्त यागाचे आयोजन..११ जोडप्यांचे हस्ते पूजा..

बळीराम पेठेतील श्री दत्त मंदिरात दत्त यागाचे आयोजन..११ जोडप्यांचे हस्ते पूजा..

जळगांव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील बळीराम पेठेतील ब्राह्मण वाडी परिसरात श्री साई बाबा मंदिरा जवळ दि.४/१२/२५, गुरुवार रोजी श्री दत्त जयंती उत्साहात साजरी होत आहे.त्या निमित्ताने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात  दि.७/१२/२५ रविवार, रोजी सकाळी ७.३० वाजता श्री दत्त मंदिरा,बळीराम पेठ,वीर सावरकर मार्ग येथे “श्री दत्त याग” आयोजिला आहे.या यागास एकुण ११ दांपत्य पुजेला बसणार आहेत.सर्व भाविकांना आवाहन आहे की, ज्या भाविकांना पुजेस बसण्याची ईच्छा आहे,त्यांनी आपली नावे खालील मोबाईल नंबर वर कळवावी.हेमंत भिडे -8411896293,सचिन गाडगीळ 9522771820 आशिष जोग 7020213694,वीरेंद्र मोदे(बाबा)9422224204 यांचेकडे संपर्क करावा व आपले नाव नोंदवावे.ह्या यागाचे पौरोहित्य श्री दिपक कुलकर्णी गुरुजी करणार आहेत.त्याच दिवशी दि.७ /१२/२५ रोजी संध्याकाळी “महाप्रसादाचा” कार्यक्रम असेल. भाविकांनी ह्या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या