Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरधुळ्यात आयोजित उत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय ब्राह्मण समाज मेळाव्यात जळगावातील ब्रह्मश्री संस्थेचे...

धुळ्यात आयोजित उत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय ब्राह्मण समाज मेळाव्यात जळगावातील ब्रह्मश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ समाज भूषण पुरस्काराने सन्मानित..

जळगांव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)धुळे येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विभाग राज्यस्तरीय स्तरावर आयोजित ब्राह्मण समाज मेळाव्यात जळगावातील ब्रह्मश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ व नंदुरबार ब्राह्मण संघ परिवार अध्यक्ष उदय जोशी यांचा परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे शुभहस्ते समाज उत्कर्षासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यात पुरस्कारात प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असा समावेश आहे.या प्रसंगी व्यासपीठावर समाज हीतासाठी उपोषण करणारे व सतत समाज उत्कर्षासाठी झटणारे दिपक रणनवरे,महिला आघाडी प्रमुख अर्चना सरूडकर,धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या सौभाग्यवती, धुळे ब्राह्मण संघ सक्रिय कार्यकर्ते भुषण जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.ब्रह्मश्री संस्था व परिवार जळगाव तर्फे डॉ निलेश राव, प्रसाद पटवे,दिपक महाजन,प्रसाद निशाणदार ,अमळनेर श्री गुरूजी,पाचोरा येथुन गिरीश बर्वे,पारोळा येथून दिपक कुलकर्णी,रावेर येथून राजेंद्र उपाध्याय यांची या प्रसंगी उपस्थिती होती.ब्रह्मश्री परिवारातर्फे राबवत असलेले विविध गरजेचे समाजोपयोगी उपक्रम तसेच समाज विकासासाठी वय व तब्येतीची तमा न बाळगता सातत्याने प्रत्येक बैठक व उपक्रमास हजर राहून अशोक वाघ तसेच उदय जोशी नंदुरबार यांनी घेतलेल्या परिश्रमाचा हा गौरव करीत असल्याचे प्रतिपादन कॅप्टन आशीष दामले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात करीत त्यांचे अभिनंदन केले व पुढील सामाजिक वाटचालीसाठी  पुरस्कारार्थी यांना शुभेच्छा दिल्या..

जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र शासकीय प्रतिनिधीची लवकर नियुक्ती होण्यासाठी दिले निवेदन…

   जळगाव शहर व संपूर्ण जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ.आशिष दामले यांना देवून परशुराम आर्थिक विकास महामंडळात जळगाव जिल्ह्याच्या कामकाजासाठी एका शासकीय प्रतिनिधी ची लवकर नियुक्ती व्हावी अशी मागणी करणारे समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या असलेले विशेष निवेदन या प्रसंगी समाजाच्या वतीने डॉ निलेश राव,प्रसाद पटवे,दिपक महाजन,प्रसाद निशाणदार,अमळनेरचे श्री गुरूजी ,पाचोरा येथुन गिरीश बर्वे,पारोळा येथून दिपक कुलकर्णी,रावेर येथून राजेंद्र उपाध्याय यांनी जळगाव जिल्ह्याच्या वतीने दिले.या नव्या शासकीय सदस्याच्या नियुक्तीने जिल्ह्यातील परशुराम आर्थिक विकास महामंडळच्या लाभार्थ्यांना  व्यापक स्वरूपात गतिशिल सेवा व उपयुक्त माहिती व मार्गदर्शन  मिळण्यास मोठी मदत होवू शकते असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या