Saturday, June 13, 2026
Homeताज्या बातम्याअखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे,शाखा भुसावळ येथे १०६ कुंडी दत्तयाग संपन्न

अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे,शाखा भुसावळ येथे १०६ कुंडी दत्तयाग संपन्न

भुसावळ – दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी,भुसावळ येथील अखिल भारतीय त्रिपदी   परिवारातर्फे ,शाखा भुसावळ  येथे १०६ कुंडी दत्तयाग संपन्न झाला.प.पू.श्री.बाबा महाराज तराणेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या सोहळ्या निमित्त,७५ दत्तयाग व सत्यदत्त पूजेचा संकल्प प.पू. श्री.नाना महाराज तराणेकर संस्थान,इंदौर,येथे करण्यात आला होता.त्या औचित्याने,अखिल भारतीय त्रिपदी परिवार,शाखा भुसावळ,यांनी घरोघरी केलेल्या ५९ दत्तयाग सांगता समारोह प.पू.श्री.बाबा महाराज तराणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथील भिरूड कॉलनीतील दत्त मंदिर येथे पार पडला.यावेळी सुमारे १०6 दत्त भक्तांनी एकाचवेळी दत्तयाग व सत्यदत्त पूजन केले.सकाळी आठ वाजता धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन,१२ वाजता प,पुं बाबा महाराज तराणेकर यांच्या हस्ते पूर्णाहुती संपन्न झाली.त्यानंतर मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात आली.प.पू.बाबा महाराज यांचे प्रबोधन दत्तभक्तांना खूपच भावले.सत्यदत्त पूजा व दत्त यागाचे महत्त्व विषद करून,वास्तुशुद्धी व निरोगी आयुष्य लाभासाठी प्रत्येकाने, आपल्या घरी दत्त याग करावा असे आवाहन केले. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संध्याकाळी करुणा त्रिपदी व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, परिभ्रमण त्रिपदी परिवाराच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.दत्त भक्त श्री.नितीन चव्हाण( भिरूड कॉलनी, भुसावळ) यांचे विशेष योगदान लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या