जळगांव – दि.१५( धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
मनोज शांताराम पाटील शिपाई लोक विद्यालय पाडळसे तालुका यावल हे संस्थाचालकांनी पदोन्नती नाकारल्याने उपोषणास बसले होते.
त्यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी उपोषण स्थळी उपस्थित राहून त्यांचे मनोबल वाढवण्याचे दृष्टीने
जिल्हाध्यक्ष योगेश भोईटे यांनी प्रयत्न करीत मा.शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्याशी औरंगाबाद येथे दूरध्वनी वर संपर्क साधत श्री मनोज पाटील यांची व्यथा मांडली.
यावेळी फिरोज पठाण साहेब व श्रीमती सुर्वे मॅडम यांना उपोषण स्थळी पाठवून चर्चा केली परंतु चर्चा असफल ठरल्याने उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असे श्री मनोज पाटील यांनी सांगितले.
यावेळी जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश भोईटे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख,शरद सुर्वे,रवींद्र पाटील जिल्हा सचिव संदीपडोलारे,सहसचिव गोरख सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.
लोक विद्यालयातील कर्मचाऱ्याचे पदोन्नती नाकारल्याने उपोषण..संघटनेचा पाठिंबा..
RELATED ARTICLES
