Friday, September 11, 2026
Homeजळगाव ग्रामीणकेंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..

भादली बुा – येथील सौ.मि.रा.महाजन प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात शिक्षिण विस्तार अधिकारी विजय पवार तसेच संस्थेचे संचालक सुनिल अत्तरदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.सदर परिषदेचे अध्यक्ष श्रीमती वैशाली बाविस्कर मॅडम होत्या सदर परिषदेत विजय पवार यांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत प्रभावी अंमलबजावणीसाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात यावे व जिल्हा स्तरावर केंद्र भादली चा तिसरा क्रमांक असून प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देऊन इतर विषयांबाबत मार्गदर्शन केले.पायाभूत चाचणी (PAT),शैक्षणिक गुणवत्ता व सद्यास्थिती,निपूण महाराष्ट्र,परख अहवाल,माझा वर्ग माझे नियोजन इत्यादी विषयांवर श्रीमती शुभांगी पाटील,सूरज भंगाळे,वासुदेव चित्ते,सुनंदा सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. सदर परिषदेचे आयोजन व प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर यांनी केले.सदर परिषदेला महात्मा गांधी विद्यालय भादली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के डी रडे व परिसरातील भोलाणे,कडगाव भादली,शेळगाव,कानसवाडे देऊलवाडे ,सुजदे येथील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक उपास्थित होते. परिषदेचे सूत्रसंचालन उपशिक्षिका निलिमा बाविस्कर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री चेतन गाजरे यांनी मानले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या