Friday, September 11, 2026
Homeक्रीडाबॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

विजयी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत विजय बी. (अंपायर),श्रीकांत पांडे(झोनल टूर्नामेंट ऑफिसर),किशोर सिंग(अनुभूती प्रशिक्षक),परीक्षित पाटील (मुख्य पंच),सत्यबोध टंकसाळी (अंपायर), जाजीब शेख (अनुभूती सहाय्यक प्रशिक्षक)CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

जळगाव दि. ९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा -२०२५ छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल दि. 7 ते 8 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूति निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविली.छत्रपत संभाजीनगर,नाशिक,पालघर, जळगाव,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.

अनुभूती स्कुलचा निकाल U14 मुले:- दिव्येश बागमार – एकेरी उपविजेते (दुसरे स्थान) – इंदर अग्रवाल आणि शिवा देवसरकर – दुहेरी उपांत्य फेरीत (तृतीय स्थान) U17 मुले:- दिव्यांश बैद आणि चिन्मयपाटीदार – दुहेरी उपांत्य फेरीत (तृतीय स्थान)U19 मुले:
– मानस बुलानी – एकेरी चॅम्पियन (प्रथम स्थान)
– श्रेनिक संचेती – एकेरी उपांत्य फेरी (तृतीय स्थान – कृष्णा क्षीरसागर आणि अक्षत लछेटा – दुहेरी चॅम्पियन्स (प्रथम स्थान)विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचै कौतुक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, जयेश बाविस्कर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या