Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedशेठ ला.ना.सार्व.विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून कूपनलिका लोकार्पण व उदघाटन उत्साहात संपन्न

शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून कूपनलिका लोकार्पण व उदघाटन उत्साहात संपन्न

>जळगाव- दि.२९(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शेठ ला. ना. सार्व. विद्यालयात संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंती निमित्ताने शाळेच्या मे १९७८ च्या इ.१० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला(बोरिंग)कूपनलिका करून देण्यात आली.त्याचा शुभारंभ व लोकार्पण शेठ ला.ना.सा.विद्यालयात रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले.या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.सुशील अत्रे,सचिव अभिजीत देशपांडे,समन्वयिका सौ.विजयालक्ष्मी परांजपे ,शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे,ज्येष्ठ पर्यवेक्षक प्रशांत जगताप,संजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सुरुवात कै.अ.वा अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.मे १९७८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कुपनलिकेचा शुभारंभ व पूजन सुशील अत्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.माजी विद्यार्थ्यांमध्ये रवीजी पांडे,विलास बर्डे,विकास बिर्ला,कमल किशोर संघवी,श्याम बिर्ला,व्यास शिवप्रसाद,दिपक अट्रावलकर, डॉ.सतीश पाटील,नरेंद्र जाधव,किशोर सूर्यवंशी,सुनील कांकरिया,रमेश काटकर,प्रमोद राका,महेंद्र रायसोनी,जयेश सोनी,दिलीप गवळी,सुनील पालवे,नितीन पाटील,जयप्रकाश बाविस्कर(माजी आमदार),प्रवीण खडके,गिरीश गुजराथी,प्रदीप सफळे,श्रीकांत दाणी,विजय बोथरा,प्रशांत पगारिया,जितेंद्र राका,संजय वाणी,प्रमोद पाटील,केतन बर्डे हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.त्याप्रसंगी माजी विद्यार्थी किशोर सुर्यवंशी यांनी आपल्या दिवंगत मातोश्री यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेला वॉटर फिल्टर संच भेट म्हणून दिला.माजी विद्यार्थ्यांपैकी श्यामजी बिर्ला,किशोर सूर्यवंशी,श्रीकांत दाणी,यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील गतकालीन आठवणींना उजाळा दिला.या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.सुशील अत्रे यांनी मनोगतातून सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आभार मानले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय वानखेडे, सूत्रसंचालन योगेश सोनजे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.मनीषा पवार यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या