Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरविद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव उद्या रविवार, २३ नोव्हेंबर रोजी रौप्य महोत्सव वर्ष...

विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव उद्या रविवार, २३ नोव्हेंबर रोजी रौप्य महोत्सव वर्ष उद्घाटन समारंभ..

जळगाव:- दि.२२( धर्मसाथी मीडिया नेटवर्क) विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव संस्थेला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने २०२५ – २६ हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहोत. या रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृह, जिल्हा उद्योग केंद्र समोर, राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ येथे संपन्न होत आहे. या प्रसंगी उद्घाटक व प्रमुखवक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत व माजी संसद सदस्य मा. श्री. कुमार केतकर, ठाणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक मा. प्राचार्य डॉ. सुनील कुमार लवटे कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत. मा. कुमार केतकर व मा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते रौप्य महोत्सवाचे उद्घाटन होणार असून याच वेळी मा. कुमार केतकर “कुंडली अस्वस्थ जगाची” या विषयावर संबोधित करणार आहेत.विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सन २००० या सालापासून निवास, भोजन, ग्रंथालय इत्यादी सुविधा नियमितपणे पुरविल्या जात असून हा प्रकल्प सर्वस्वी समाजाच्या मदतीने सुरु असून कोणतेही शासकीय अनुदान नाही. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग खुला झाला असून एक आधाराचा हात व आत्मविश्वास मिळाला आहे.सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, मदतगार यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.डॉ.एस.एस.राणे अध्यक्ष विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव यांच्यां प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या