Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरराष्ट्रसेवा फाउंडेशनच्या भव्य तिरंगा रॅली द्वारे भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा..सुरक्षा दलाला...

राष्ट्रसेवा फाउंडेशनच्या भव्य तिरंगा रॅली द्वारे भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा..सुरक्षा दलाला अभिवादन..शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण..

जळगांव-दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) राष्ट्रसेवा फाउंडेशन च्या वतीने भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन  तसेच सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.संकट मोचक महाराष्ट्राचे नेते राज्यमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली,लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून’ऑपरेशन सिंदूर’ राबवले.भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन राष्ट्र सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’ वंदे मातरम,अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला. तसेच सेनेवर शहीद झालेल्या शहिदांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी राज्याचे मंत्री नामदार श्री गिरीश महाजन,खा.श्रीमती स्मिताताई वाघ,आ.श्री.सुरेश(राजू मामा) भोळे,महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी,माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह श्री युसुफ मकरा,माजी महापौर सीमाताई भोळे,माजी महापौर भारती सोनवणे,रेखा वर्मा,दीपमाला काळे भैरवी वाघ,पलांडे विष्णू भंगाळे,आर.पी.आयचे अनिल अडकमोल,माजी सैनिक सी.डी.पाटील,माजी सैनिक ईश्वर मोरे,माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील,विशाल त्रिपाठी,भगत बालानी,प्रकाश बालानी,राजु मराठे, नितीन इंगळे,राहुल वाघ,आनंद सपकाळे,अजित राणे,विनोद मराठे,अतुलबारी यांच्यासह विविध सामाजिक संघटना शैक्षणिकसंघटना,एन.जी.ओ,डॉक्टर,वकील,शिक्षक व सरकारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरचे जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष,मंडळ पदाधिकारी, नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख मोठ्या संख्येत उपस्थित होते जळगावकर विराट संख्येने सहभागी झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या