Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरमाध्यमिक शालांत परीक्षा २०२५ निकालात ॲम्बिशन कोचिंग क्लासेस व स्वामी अकॅडमीतील...

माध्यमिक शालांत परीक्षा २०२५ निकालात ॲम्बिशन कोचिंग क्लासेस व स्वामी अकॅडमीतील विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी..गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन..

जळगांव –  दि.१९  (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रु-मार्च२०२५ १०.वी च्या निकालात ॲम्बिशन कोचिंग क्लासेस व स्वामी अकॅडमीने यशाची उज्वल परंपरा कायम राखत प्रभावी असा १०० टक्के निकाल लागला आहे.अनेक विद्यार्थ्यांनी क्लासेसच्या अनमोल व दिशादायक मार्गदर्शनाचा लाभ घेत परिश्रमाने यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे.

क्लासच्या होतकरू विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशस्वी गरुड भरारी साठी संस्थापक दीपक सोनार सर, संचालिका स्वामी अकॅडमी हर्षा पाटील,पुनम चौधरी ,दिव्या मोतीराळे,दीप्ती पाटील,राधा मिमरोट,अर्चना पाटील,पूजा सोनार,निलेश सोनार,प्रदीप पाटील,वर्षा पाटील.आणि सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक केले आहे.क्लासेसच्या वतीने दरवर्षी आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पण होतकरू असणाऱ्या अश्या ५ विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात कोणतीही आकारणी न घेता मदत केली जाते. तसेच इतर विद्यार्थ्यांना देखील  त्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेवून क्लास तर्फे योग्य त्या प्रमाणात ती सवलत दिली जाते.क्लासेसच्या घवघवीत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांत
आर्यन देविदास चौधरी-८६.००%,संजना शांताराम कोळी-८०.२०%,राजश्री रवींद्र बारी,७९.२०%,जयेश किशोर महाजन-७७.४०%,योगिता प्रवीण महाजन – ७७.४०%,खुशी पिंटू सपकाळे ७६.२०%,परशुराम ज्ञानेश्वर सोनवणे६६%,जयेश किशोर वंजारे६७.६०%,
सत्यम चंपालाल बारेला६३.६०%,ललित गणेश भोई ६३%,राम शिवाजी कोकाटे ६१.२०% आदित्य योगेश गायकवाड ६०%, पियुष दीपक भोई ५८%पल्लवी हिरामण पवार५६.२०%,दुर्गेश कैलास गोसावी ५७.८०% ,खुशी कैलास गोसावी ४९.२०% या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणून ६ विद्यार्थ्यांनी(विशेष प्राविण्य) श्रेणी आणि ५९ विद्यार्थ्यांनी(प्रथम श्रेणी) मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. सर्व गुणवंतांचे क्लासेस तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.येत्या १३ ते १५ जूनच्या दरम्यान  विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी १० वी निकालात उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा,विद्यार्थिनींचा सन्मान एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती संस्थापक स्वराज्य फाउंडेशन संचलित ॲम्बिशन कोचिंग क्लासेस आणि स्वामी अकॅडमी जळगाव तर्फे देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या