Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरपरिश्रमाला परिवर्तनाची जोड उद्योगाला समृध्द करते - सुनिल भंगाळे..प्रेरणादायी मुलाखतीतून उलगडले यशाचे...

परिश्रमाला परिवर्तनाची जोड उद्योगाला समृध्द करते – सुनिल भंगाळे..प्रेरणादायी मुलाखतीतून उलगडले यशाचे रहस्य..

जळगांव – दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) कधी कधी एक अनुभव,एक विचार किंवा एक संवाद आपल्या व्यवसायाची आणि आयुष्याची दिशाच बदलू शकतो.शनिवारी दि.१५ रोजी संध्याकाळी ७.४५ वाजता हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास,अनुभव आणि विचार प्रत्यक्ष ऐकण्याची संधी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आली.यशस्वी उद्योजक,जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष केमिस्ट भूषण सुनील भंगाळे यांनी मांडलेली त्यांच्या व्यवसायातील आव्हाने ,निर्णय व्यापक स्वरूपातील धार्मिक व सामजिक कार्य,राबविलेले यशस्वी सामाजिक उपक्रम आणि यशामागची प्रेरणादायी कथा उपस्थितांनी उत्सुकतेने जाणून घेतली.नव्या पिढीला संवादातून नवीन दृष्टिकोन,प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले.जर मुलाखतकार उत्तम असेल तर हा संवाद अजून खुलतो त्याप्रमाणेच क्लब मधले असेच उत्तम मुलाखतकार दिनेश थोरात यांनी ही मुलाखत घेतली.यात यशाचे पैलू उलगडताना सुनिल भंगाळे यांनी आपले अनेक वैयक्तिक अनुभव कथन करताना  सांगितले की कोणतेही यश खडतर परिश्रम मार्गदर्शन घेवून निर्णय ,जिद्द,धोका पत्करण्याची मानसिक तयारी,परिवर्तनाचा विचार,या पंचसूत्रीला अवलंबून मिळू शकते,आपण उद्यम कार्यात प्रवाहित होवून इतरांना यात सहभागी करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.यशाची सुरुवात झाल्यावर हुरळून जाता कामा नये.यशोशिखर गाठताना  करावयाचा प्रवासात विचलित होता कामा नये सातत्य कायम असावे असेही ते म्हणाले  या खास संवादातून सर्वजण प्रेरणा घेऊया आणि आपल्या व्यवसायाला नवी दिशा देऊया असे आवाहन करीत मुलाखतीचा समारोप झाला.बैठक समन्वयक जयेश पाटील,डॉ.दिपक कृष्णकुमार पाटील,सेक्रेटरी एस.सी.जी.टी जळगांव यांचेसह अभिजित पाटील,अभिजित वाथ,डॉ.दीपक पाटील,वृषाली छापेकर यांनी आयोजन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या