Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरगरीब परिस्थितीतील गरजू विद्यार्थ्यांना आशेचा किरण...विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव...

गरीब परिस्थितीतील गरजू विद्यार्थ्यांना आशेचा किरण…विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव…

जळगांव – दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) मनुष्याच्या जीवनामध्ये शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षणामुळे मनुष्याचा विकास होतो असे नाही तर समाज व देशाचाही सर्वांगिण विकास होतो.पण दुर्दैव असे की,अनेकांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही किंवा शिक्षण मधूनच सोडावे लागते. या गोष्टीचा विचार करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार व कार्य यापासून प्रेरणा घेऊन खेड्यापाड्यातील अत्यंत गरजू व होतकरू मुलांना जळगाव शहरात शिकता यावे,आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती करता यावी यासाठी त्यांच्या निवासाची व भोजनाची विनामूल्य सोय व्हावी म्हणून सन २००१ मध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना करण्यात आली.
“विद्यार्थी सहाय्यक समिती हा लोकांचा प्रकल्प आहे, जो उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी लोकांद्वारे चालवला जातो.”
विद्यार्थी सहाय्यक समिती मार्फत चालविले जाणारे प्रकल्प
१. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह
२. पॉल हॅरिस ग्रंथालय
३. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
४. लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव विद्यार्थी सहायता योजना
५. कमवा आणि शिका योजना
६. वैद्यकीय सेवा – लोकहित दवाखाने (७) व लोकहित जेनेरिक मेडिकल स्टोअर्स (७)ध्येय
“भारतातील वंचित तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण देऊन सक्षम करणे, त्यांच्या क्षमतांना विकसित करणे आणि समाजाचे आणि राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवणे.” उद्दिष्टे
• विद्यार्थ्यांमध्ये श्रमदान, स्वयं-मदत आणि स्वयं-शिस्तीचे महत्व रुजविणे.
• राष्ट्रीय एकात्मता भावना आणि धर्मनिरपेक्ष मानवतावादी दृष्टिकोन असलेले स्वावलंबी, ज्ञानी नागरिक निर्माण करणे.
• वंचितांना शिक्षित करणे, त्यांचे संगोपन करणे आणि त्यांना आधार देणे.
• समतापूर्ण समाज निर्माण करणे.वैशिष्ट्ये
• शासनाचे कुठलेही अनुदान न घेता लोकसहभागातून हा प्रकल्प सुरु आहे.
• गरीब, गरजू, होतकरू व स्वावलंबी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.
• सर्व जाती-धर्माच्या मुलांना प्रवेश.
• कमवा – शिका योजनेची अंबलबजावणी.
• सुसज्ज अभ्यासिका व प्रशस्त ग्रंथालय सोय.
• स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
• परतफेड करण्याच्या हमीवर गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी रक्कम उपलब्ध करून दिली जाते.
• जेनेरिक औषधांविषयी जागरूकता कार्यक्रम आयोजित करते.
• वंचित भागात ०७ लोकहित क्लिनिक आणि ०७ जेनेरिक मेडिकल स्टोअर्स चालवते जेणेकरून समाजाला आरोग्य सेवा मिळतील.रौप्य महोत्सवी वर्षातील राबविण्यात येणारे कार्यक्रम
रौप्य महोत्सवी वर्षात नियमित वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात
१. प्रबोधनपर व्याख्यानमाला
२. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन प्रदर्शनी
३. समाज सुधारक शैक्षणिक, सामाजिक योगदानाविषयी चित्रपट
४. कृतज्ञता सोहळा – समितीचे हितचिंतक , मदतगार यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.भविष्यातील प्रकल्प रौप्य महोत्सवी वर्षातील सुरु करण्यात येणाऱ्या योजना
• १० वी /१२वी नंतर विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजातील युवक, महिला व बेरोजगार घटक यांच्यासाठी “स्कूल ऑफ स्कील डेव्हेलपमेंट” सुरु करणे.
• स्वावलंबन योजना – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या होतकरू मुले व मुलींना व्यवसायासाठी बीज भांडवल परत देण्याच्या हमीवर बिजभांडवल पुरविणे व याद्वारे मायक्रो फायनान्स जाळे तयार करणे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या