जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दि.७ रोजी पद्मालय विश्राम गृह येथे कोविड १९ कर्मचारी वर्गाची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीचे आयोजन सदर माजी कर्मचारी द्वारा करण्यात आले होते.
या बैठकीत विविध मुद्यावर सकारात्मक विचार विनिमय झाला.सदर बैठकीत युवराज सुरवाडे तसेच निलेश बोरा यांनी मार्गदर्शन केले.आपली लढाई आपणच लढावी असे सूचक व्यक्तव्य युवराज सुरवाडे यांनी केले.तर निलेश बोरा यांनी कोविड कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कसे धाडसाने आपले कर्तव्य बजावले हे सांगितले.
आम्ही महापौर आणि उपमहापौर यांनी निवेदने दिले आहेत.पुढील ठरावात आपली बाजू महापालिकेत महापौर आणि उपमहापौर मांडतील असे आश्वासन त्यांनी आपणास दिली आहे.आणि या पुढील कार्य तुम्हांस वेळेवेळी सुचवणार आहोत असे या बैठकीतून स्पष्ट केले आहे.
आता ही लढाई एक व्यक्तीची नसून आपण सर्वांची आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत या मोर्चेला आपण पुढे त्यांचे आहे. असे सूचक व्यक्तव्य सुरवाडे यांनी केले त्याला प्रतिसाद जमलेल्या विविध योद्धांनी साद दिला. पुढील ही लढाई आपण धरणे आंदोलने शांततेने होईल अशी रूपरेषा आखण्यात आली. या बैठकीत वाल्मीक सपकाळे यांनीही मार्गदर्शन केले. जमलेल्या कर्माची वर्ग आणि हल्ली ठेकेदारीवर जी एम सी त काम करणारे कोविड कर्मचारी यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
शासकीय रुग्णालय येथे ठेकेदार आमची कशी पिळवणूक करतात आमचा जो हक्काचा प्रीविडेड फंड ठेकेदार कसे अफरातफर करतात अशी व्यथा यश कुमावत या कर्मचाऱ्याने मांडली. यावर आपण काही करता येईल का असा सूचक सवाल याद्वारे त्यांनी केला. त्यावर योग्य ते काय करता येईल अशी आशा निलेश बोरा यांनी केले.
सदर बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल युवराज सुरवाडे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश वानखेडे,विनोद सपकाळे,संतोष ताडे,बबन सावळे,भूषण पाटील,लक्ष्मण पाटील आदींनी परिश्रम घेतले.
height=”240″ />
कोविड कंत्राटी कर्मचारी यांची बैठक संपन्न
RELATED ARTICLES
