Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरआर.आर.विद्यालयात हिंद दी चादर कार्यक्रम संपन्न..

आर.आर.विद्यालयात हिंद दी चादर कार्यक्रम संपन्न..

जळगाव – दि.२७(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) आर.आर. विद्यालयात दि.२६ रोजी हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वां शहीदी समागम कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका पी एस याज्ञिक होत्या.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षिक संजय पिले, एस डी पाटील, गिरीष रमणलाल भावसार,वाय.जी.चौधरी उपस्थित होते.प्रारंभी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एस साबळे यांनी केले.जे एम पाटिल यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतात पी एस याज्ञिक यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या योगदानाविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी महाजन यांनी केले तर आभार के जे सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कार्यक्रमासाठी वाय बी न्हासदे व एस आर महाजन ,जी आर महाजन यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या