जळगाव, दि.५ (धर्मसाथी लाईव्ह न्यूजप) जळगाव जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त गुरुनानक ऑप्टिकल या ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभवाची वाटचाल आता नव्याने अत्याधुनिक दालन‘ऐनक प्लस’च्या रूपाने अत्याधुनिक सेवेसह जळगावकरांच्या सेवेत येणार आहे.रिंगरोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये आज दि.५ एप्रिल रोजी ‘ऐनक प्लस’चा शुभारंभ उत्साह पूर्ण वातावरणात होत आहे.
जळगाव जिल्हावासियांच्या सेवेत गत ३० वर्षापासून विश्वास पात्र होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या मशीनने ग्राहकांसाठी मोफत नेत्र तपासणीची सोय देखील उपलब्ध आहे.
नव्या दालनात ब्रँडेड फ्रेम्स,गॉगल्स,लेन्सेस उपलब्ध
‘ऐनक प्लस’मध्ये रेबैन, ओकले,जग्वार,वॉग,फ़ास्ट ट्रॅक,वुल्फ आईज,पोलोराईड,इंसिस्ट,फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स,गॉगल्स तसेच झाईस कंपनी च्या लेन्सेस उपलब्ध असतील.वातानुकूलित दालनात अत्यंत वाजवी दरात फ्रेम्स,गॉगल्स ग्राहकांना मिळणार आहेत.
आज रिंग रोडवर नव्या दालनाचा शुभारंभ
रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये आज दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता‘ऐनक प्लस’चा शुभारंभ करण्यात येणार आहे.सर्व सन्माननीय जळगाव कर नागरिकांनी अवश्य भेट द्यावी अशी विनंती संचालक दिनेश गेही आणि आकाश घुमनानी यांनी केली आहे.
