जळगाव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई यांच्या शिकवणीनुसार भजनाने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जळगाव शहरातील परमार्थ निकेतनच्या दोन ठिकाणी हा उत्सव भक्तिमय वातावरणात होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परमार्थ निकेतन,शामाप्रसाद मुखर्जी उद्यान,स्टेशन रोड, जळगाव तसेच परमार्थ निकेतन,शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर,पिंप्राळा येथे ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम होईल.
दोन्ही ठिकाणी दुपारी १०.३० ते १२ वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्म, तसेच रात्री १० ते १२ वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्म, रात्रौ स्मरण व भजन असे कार्यक्रम होणार आहेत. भजन, नामस्मरण आणि श्रीकृष्ण जन्मसोहळ्यामुळे दोन्ही ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या मंगलमय श्रीकृष्ण जन्मोत्सवात सर्व भक्तांनी सहकुटुंब सहभागी होऊन श्रीकृष्ण भजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
