Saturday, September 5, 2026
Homeजळगांव शहरजळगावात श्री दक्षिणमुखी हनुमान व शिव मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा..मान्यवरांची उपस्थिती..

जळगावात श्री दक्षिणमुखी हनुमान व शिव मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा..मान्यवरांची उपस्थिती..

जळगाव :- दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जय गुरुदेव नगर,बुलेट शोरूममागे,भुसावळ रोड येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात श्री दक्षिणमुखी हनुमान व शिव मंदिराचा भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्या दि.३० रविवार व दि.३१ सोमवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.</strongदि.३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी व कार्यक्रम होणार आहेत.दि.३१ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम होतील.दि.३१ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी डॉ.श्री.शांतराम दादा सोनवणे यांच्या शुभहस्ते धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.या सोहळ्यास आमदार सुरेश दामू भोळे, आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज सुरेश चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत..या दोन दिवसीय धार्मिक सोहळ्याचा व महा प्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन जयगुरुदेव नगर येथील सर्व रहिवासी व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या