जळगाव – दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगाव त्रिपदी परिवाराची गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजीची साप्ताहिक त्रिपदी रामानंदनगर येथील गुरुबंधू दिलीप यशवंत जोशी यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात‘दिगंबरा दिगंबरा’च्या गजरात संपन्न झाली.
यावेळी श्री.व सौ.दिलीप यशवंत जोशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.तबला साथ वृषभ खैरनार यांनी केली. त्रिपदी परिवारातील सुमारे २० ते २५ स्त्री-पुरुष सदस्य तसेच गुरुबंधूंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
६ सप्टेंबर रोजी निभोरा-विवरे येथे महा त्रिपदी
यावेळी पुढील सेवेबाबत विशेष सूचना देण्यात आली. गुरुबंधू अनिल तारे यांनी सप्टेंबर महिन्यातील मासिक महा त्रिपदी निभोरा-विवरे येथे नाना चौधरी यांच्या इच्छेनुसार जळगाव त्रिपदी परिवाराच्या वतीने घेण्यात यावी,अशी विनंती केली होती.त्यांच्या विनंतीला मान देऊन रविवार,दि.६ सप्टेंबर २०२६ रोजी निभोरा-विवरे येथे मासिक महा त्रिपदीचे आयोजन करण्यात आले आहे.या सेवेसाठी जास्तीत जास्त गुरुबंधूंनी उपस्थित राहण्याचा उत्साह यावेळी व्यक्त केला.
जळगाव त्रिपदी परिवाराची साप्ताहिक त्रिपदी उत्साहात संपन्न..
RELATED ARTICLES
