Saturday, September 5, 2026
Homeताज्या बातम्याकामगारांच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; एचडीएफसी बँकेतील सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगार

कामगारांच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; एचडीएफसी बँकेतील सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगार

मुंबई – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून एचडीएफसी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या मूळ कार्यस्थळी पुन्हा नियमितपणे सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे संबंधित सुरक्षा रक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.संघटनेच्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांच्या सेवेसंदर्भात निर्माण झालेल्या समस्येनंतर संघटनेने संबंधित प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच कंपनी व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. कामगार कायदे, कोड ऑन वेजेस २०१९ आणि कोड ऑन सोशल सिक्युरिटी २०२० यांचा आधार घेत संघटनेने कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला.या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण नलावडे, उपाध्यक्ष विश्वनाथ दळवी, चिटणीस राजेश बंडागळे तसेच उपचिटणीस सचिन करंडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुरक्षा रक्षकांना पुन्हा नियमित रोजगार उपलब्ध झाला.संघटनेने एचडीएफसी बँक लिमिटेडच्या प्रशासनाने दाखविलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले असून हा विजय केवळ सुरक्षा रक्षकांचा नसून संघटित कामगार चळवळीच्या एकजुटीचा विजय असल्याचे नमूद केले आहे.भविष्यातही कामगारांचे हक्क, रोजगाराची सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षणासाठी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना कटिबद्ध राहणार असल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या